Ad will apear here
Next
सोशल मीडिया
तंत्रज्ञानाच्या या काळात समाजमाध्यमांच्या प्रसाराचा वेग अचाट आहे; मात्र सोशल मीडिया म्हणजे काय, असे विचारले तर अनेकांना सांगता येत नाही. अशा परिस्थितीत सोशल मीडियाचे इतर माध्यमांपेक्षा असलेले वेगळेपण, त्याची वैशिष्ट्ये, सोशल मीडियावरील आशयाची विविधता, हे माध्यम नेमके कसे वापरावे आदी मुद्द्यांबद्दल योगेश बोराटे यांनी ‘सोशल मीडिया’ या पुस्तकातून मार्गदर्शन केले आहे. सोशल मीडियासंबंधी नवी दृष्टी व नवे भान या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सोशल मीडिया समजून घेऊन त्याचा प्रभावी उपयोग कसा करायचा, हे या पुस्तकात सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. सोशल मीडियाचे वर्गीकरण, वैयक्तिक पातळीवरील फायदे व त्याचे दुष्परिणामही सांगितले आहेत. ‘सिक्स डिग्रीज डॉट कॉम’, ‘फ्रेंडेस्टर’, ‘हाय फाइव्ह’, ‘ऑर्कुट’, ‘फेसबुक’, ‘लिंक्डइन’ अशा सोशल मीडियाच्या विविध व्यासपीठांची ओळख करून देऊन त्यांचा दैनंदिन वापर, सामाजिक चळवळी व राजकीय वापर कसा केला जातो, हे यात नमूद करण्यात आले आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यू-ट्यूबचे जग यातून उलगडण्यात आले आहे.

पुस्तक : सोशल मीडिया
लेखक : योगेश बोराटे
प्रकाशन : अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव
पृष्ठे : १२६
मूल्य : १५० रुपये

(‘सोशल मीडिया’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZSXCB
Similar Posts
सोशल मीडिया आणि व्यावसायिक जग ‘सोशल मीडिया’ हा आजच्या युगाचा परवलीचा शब्द आहे. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे, प्रभावी वापर केल्यास अनेक आश्चर्ये घडू शकतात. त्यासाठीचे मूलभूत मार्गदर्शन योगेश बोराटे यांनी ‘सोशल मीडिया’ या पुस्तकातून केले आहे. या पुस्तकातील एक प्रकरण येथे प्रसिद्ध करत आहोत.
फेसबुकची मोहनिद्रा ‘फेसबुक’, ‘व्हॉट्सअॅप’ इत्यादी ‘बुलेट ट्रेन्स’ भरधाव वेगाने पुढे जात आहेत. त्यांना शेवटचे स्टेशन नाही किंवा परतीचा प्रवास नाही. आपण त्यांच्यासह प्रवासात टिकून राहिले पाहिजे, किंवा वाटेतल्या एखाद्या स्टेशनवर उतरले पाहिजे. चार फेब्रुवारी हा फेसबुकचा स्थापना दिवस. त्या निमित्ताने, ‘किमया’ सदरात रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत ‘फेसबुकच्या मोहनिद्रे’बद्दल
मर्यादित लोकशाही डॉट इन! नवमाध्यमे, समाजमाध्यमांकडे पाचवा स्तंभ म्हणून पाहिले जात आहे. हा पाचवा स्तंभही लोकशाहीच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाऊ लागला आहे; मात्र अनेकदा आशयाच्या मुद्द्यावरून पारंपरिक माध्यमे विरुद्ध नवमाध्यमे अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. माध्यमांमधील हे कलह सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असले, तरी
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची वॉर-रूम कार्यान्वित पुणे : ‘विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी वॉर-रूम कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टीम पोचणार असून, आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे,’ अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी रविवारी (८ सप्टेंबर) पत्रकारपरिषदेत दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language